लोहारा/प्रतिनिधी-
काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांच्या मदतीसाठी चाईल्ड - लाईन 1098 ही संस्था नेहमीच धाऊन जाते. या नंबरची जनजागृती करण्यासाठी संचालक डॉ. दापके- देशमुख दिग्गज हे जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत स्वतः माहिती देत आहेत. उस्मानाबाद M.I.D.C. परिसरात येथील दक्ष नागरिक अमित बनसोडे यांना बिहार राज्यातील  12 वर्षे वयाचा मुलगा विपन्नावस्थेत भटकत असलेला दिसला. त्यांनी आनंद नगर पोलीस स्ठेशनला माहिती सांगितली असता, पोलिस विभागाने चाईल्ड लाईन उस्मानाबाद कार्यालयात माहिती सांगितली. मुलास बाल कल्याण समिती समोर हजर करून त्याची रवानगी निरीक्षण गृहात कली असून या मुलाच्या नातेवाईकाचा पोलीस शोध घेत असून, सदरील बालकास कोणी ओळखत असल्यास चाईल्ड - लाईन उस्मानाबाद 1098 किंवा आनंद नगर पोलीस स्ठेशनला संपर्क साधण्याचे आवाहन संचालक डॉ. दापके - देशमुख दिग्गज यांनी केले आहे.
 
Top