
उस्मानाबाद जिल्ह्यातील मराठा समाजाचा पहिला वधू- वर परिचय मेळावा रविवारी (दि. 1) तुळजापूर येथे उत्साहात पार पडला. मेळाव्यात संपूर्ण राज्यातून 550 विवाहेच्छुक मुला-मुलांनी सहभाग नोंदविला.
श्री तुळजाभवानी पुजारी मंडळ मंगल कार्यालयात मराठा सोयरीक संघ महाराष्ट्र व मराठा सोयरीक संघ शाखा तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे उद्?घाटन संस्थापक अध्यक्ष सुनिल जवंजाळ? पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर संघाच्या महिला जिल्हाध्यक्षा जयश्री सूर्यवंशी-पाटील, शहराध्यक्षा मधुमती अमृतराव, सह शहराध्यक्षा लक्ष्मी करडे आदींसह जिजाऊंच्या लेकी उपस्थित होत्या. कोणत्याही प्रवेश किंवा नोंदणी शुल्काशिवाय केवळ लोकसहभागातून आयोजित मेळाव्याचे यशस्वी आयोजन सोयरिक संघ महिला शाखा व बचत गटांच्या महिलांनी केले. यशस्वितेसाठी संस्थापक अध्यक्ष जवंजाळ पाटील, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब पाटील, पूजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन साळुंके, नगरसेवक अमर मगर, दुर्गादास अमृतराव, किरण खपले, राहुल खपले, उत्तम अमृतराव, मनोहर पवार, राजेश शिंदे, राजाभाऊ रोचकरी, प्रा. धनंजय लोंढे, युवराज पवार, राजेश्री इंगोले, मंदाकिनी पवार, बाळासाहेब कुतवळ, काकासाहेब शिंदे, संतोष दरेकर, आशा कदम, मंदाकिनी पवार, राजश्री इंगळे, मीना माने, सुनंदा भोसले, मंगल पवार, सुनिता पवार, स्मिता खोपडे, बाबासाहेब कदम आदींनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन डॉ. सुयोग अमृतराव, भैरवनाथ कानडे, अरविंद हंगरगेकर यांनी केले तर आभार उत्तम अमृतराव यांनी मानले.