नळदुर्ग/प्रतिनिधी-सन  २००८ ते २०१२ या कालावधीमध्ये नळदुर्ग पालिकेने राबविलेल्या केंद्र शासन पुरुस्कृत एकात्मीक गृह निर्माण व झोपडपटटी विकास योजने अंतर्गत घरकुल योजने सुमारे दोन कोटी ४३ लाख ७९ हजार १७ रुपये इतक्या रक्कमेचा अपहर करुन शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी घरकुलच्या ठेकेदारासह तात्कालीन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी आणि नगर अभियंता अशा एकूण आठ जणांवर नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आसल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान हा गुन्हा मागील सहा सात महीन्यापूर्वीच दाखल होणार होता पंरतु यातील जबाबदार पदाधिकारी आणि अधिकारी भाजपाच्या आश्रयास गेले आसल्याने राजकीय दबावापोटी यातून मार्ग काढण्याचा केवीलवाणी प्रयत्न केला होता पंरतु शनिवार दि. ३० नोव्हेंबर रोजी अखेर या घरकुल घोटाळयातील दोषीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नळदुर्ग नगरपालिकेने सन २००८ मध्ये केंद्र शासन पुरुस्कृत एकात्मीक गृह निर्माण व झोपडपटटी विकास योजने अंतर्गत सुमारे १२०६ घरकुलांची एकूण वीस कोटी रुपयेची मोठी योजना मंजूर करुन घेण्यात आली होती. तात्कालीन नगराध्यक्ष उदय जगदाळे यांनी ही योजना मंजूर करुन आणली होती मात्र या योजनेचा लाभ शहरातील एका ही गोर गरीब नागरीकांना मिळाला नाही, या योजने साठी नागरीकांनी आपल्या हिश्याचा लोकवाटा भरुन ही या योजने पासून नागरीक वंचीत राहीले आहेत, अशातच या योजनेच्या माध्यमातून शहरात एकूण तीनशे दोन घरकुले बांधण्यात आली आणि या तीनशे दोने घरकुलांवरती या योजनेचा आर्धा निधी पार करण्यात आला. संबंधीत ठेकेदार, पदाधिकारी, मुख्याधिकारी यांनी मिळून या योजनेचा बोजवारा उडविला होता. दरम्यान बांधलेली घरकुले ही अत्यंत निकृष्ठ आणि राहण्या योग्न न बांधता योजनेचा निधी केवळ हडप करण्यासाठी थातूर मातूर बांधकाम करुन तीनशे दोन घरकुलांवरती सुमारे दहा कोटी रुपयेचा निधी पार करण्यात आला त्यामुळे या योजने मध्ये मोठा घोटाळा झाल्याचे लक्षात आल्यानंतर या योजनेतील दोषीवर कारवाई करावी म्हणून एक जनहित याचिका औरंगाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. दरम्यान न्यायालयाच्या आदेशानुसार आणि विभागीय आयुक्त यांच्या नेमलेल्या एका समीतीकडून मे २०१९ मध्ये या योजने तील बांधकाम करण्यात आलेल्या घरकुलांची घरनिहाय मोजमाम करुन चौकशी करण्यात आली. दरम्यान या समीतीच्या अहवालानुसार या योजनेत मोठया प्रमाणात शासनची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले आसल्याने या योजनेतील दोषीवर कडक कारवाई करावी व विभागीय आयुक्त यांच्या आदेशानुसार दोषींवर तात्काळ  गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. पंरतु या योजनेत जे दोषी होते त्यांनी तात्काळ भाजपाच्या आश्रयास जावून बसले आणि यातून राजकीय दबाव आणून आपली कातडी वाचविण्याचा केवीलवाणी प्रयत्न केला होता. 
या योजनेत सुमारे दोन कोटी ४३ लाख ७९ हजार १७ रुपये इतक्या मोठया रक्कमेची अपहर करुन शासनाची मोठी फसवणूक केली आहे त्यामुळे पालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांच्या फिर्यादीवरुन दि. ३० नोव्हेंबर २०१९ रोजी नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या फिर्यादी मध्ये म्हटले आहे की, दि. ५.३.२००८ ते दि. ३०.३.२०१२ दरम्यान सर्व्हे नं. २३६ व २९ मध्ये एकात्मीक गृहनिर्माण व झोपडपटटी विकास योजने अंतर्गत घरकुल योजना राबविली व या योजनेच्या कामकाजात संगनमताने शासनाच्या रक्कमेचा अपाहार करुन शासनाची फसवणूक करण्याच्या उददेशाने बनावट मोजमाप पुस्तीका तयार करुन यातील बनावट नोंदी खऱ्या म्हणून भासवून शासनाची दोन कोटी ४३ लाख ७९ हजार १७ रुपयेचा अपहार करुन फसवणूक केल्याचे चौकशी दरम्यान निष्पन्न झाल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने या योजनेचे ठेकेदार मे. मिनार कन्ट्ासरशन लातूरचे मालक, साया इंजिनीअर्स चे मालक लातूर, संजय सुधाकर राजहंस लातूर, तात्कालीन मुख्याधिकारी दिलीप देशमुख, तात्कालीन नगराध्यक्ष उदय आंबादास जगदाळे, तात्कालीन उपनगराध्यक्ष नय्यरपाशा सज्जादअली जहागिरदार, तात्कालीन नगराध्यक्षा श्रीमती निर्मला अरविंद गायकवाड व पालिकेचे तात्कालीन अभियंता ए आर खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक श्री लहाने करीत आहेत. 
दरम्यान या घरकुल योजने तील दोषी हे शहरात उजळ माथ्याने फिरत होते, शासनाला सुमारे दोन कोटी साठ लाख रुपये ला चूना लावून राजकीय दबाव आणून यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न या दोषींनी आजपर्यंत केला  होता मात्र अखेर शासनाच्या पैशाचा अपहर करुन शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी या दोषीवर गुन्हा दाखल झाल्याने शहरात  एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या योजनेचा आर्धा निधी खर्च या योजने तील तीनशे दोन घरकुलांवर खर्च होवून ही या योजनेतील एका ही लाभार्थ्यांला एक ही घरकुल मिळाले नसल्याने गोर गरीब लाभार्थी या योजने पासून वंचीत राहीले आहेत याला सर्वस्वी या योजनेतील रक्कमेचा अहपहर करणारे दोषीच जबाबदार आहेत अशीच चर्चा आता शहरात रंगत आहे.
 
Top