
शहरातील आदर्श महाविद्यालया तील इंग्रजी विषयाचे तज्ज्ञ डॉ. प्रशांत मोटे यांच्या शोधनिबंधांची निवड सिंगापूर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत झाली आहे.
साऊथ इस्ट एशिया परिषदेच्या वतीने सिंगापूर येथे नॅशनल इन्सिट्यूट ऑफ एज्युकेशन अॅण्ड नॅशनल टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी सिंगापूर यांच्या वतीने रिथिकींग पॅराडिगम्स अॅण्ड अॅपरोचेस टू रिसर्चिग, टिचिंग अॅण्ड लिटरेट विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत डॉ. प्रशांत मोटे यांच्या युज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजीज टू इनरिच इंग्लिश व्होकेब्लरी फॉर इएसएल स्टुडंट्स या शोधनिबंधाची निवड करण्यात आली आहे. श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनायकराव पाटील, सरचिटणीस बसवराज पाटील, सचिव रामकृष्णपंत खरोसेकर, प्राचार्य डॉ. दिलीप गरूड, उपप्राचार्य डॉ. सुरेश कुलकर्णी, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. तानाजी पवार, प्रा. डॉ. सुधीर मठपती यांच्यासह प्राध्यापक, कर्मचा-यांनी अभिनंदन केले.