उस्मानाबाद/प्रतिनिधी-
भारतीय जनता पार्टी जिल्हा उस्मानाबाद च्या वतीने देशाचे माजी ग्रामविकास मंत्री तथा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. गोपीनथरावजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा भाजपा कार्यालयात स्व. गोपीनथरावजी मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीन काळे, जिल्हा उपाध्यक्ष अँड. नितीन भोसले, चिटणीस इंद्रजीत देवकते, शहर सरचिटणीस जीवन वाठवडे, शहर उपाध्यक्ष शितल बेदमुथा, अल्पसंख्यांक मोर्चा सरचिटणीस शरीफ शेख, नगरसेवक बालाजी कोरे, दाजीप्पा पवार, सुजित ओव्हाळ, गिरीश पानसरे, लक्ष्मण माने आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top