उस्मानाबाद/प्रतिनिधी-
वाशी तालुक्यातील इंदापूर येथील निवासी व उस्मानाबाद जिल्हयाचे शिवसेना सहसंपर्कपमुख तथा मोठे उद्योजक शंकरराव बोरकर यांनी आपल्या मुंबई येथील शेतामध्ये वेळ आमवस्या सण पारंपारिक पध्दतीने साजरा केला.  यावेळी त्यंाचे पुत्र आमोल बोरकर यांची उपस्थिती होती. मुंबई येथील पळा-पळीच्या जीवनात सुध्दा बोरकर यांनी आपली संस्कृती जपल्यामुळे त्यंाचे गांवाकडल्या लोकांमध्ये मोठे कौतुक केले जात आहे.
शिवसेना नेते शंकरराव बोरकर यांनी आपल्या उद्योगाची मुहूर्तमेंढ मुंबई शहरात रोवली. आपल्या अथक परिश्रमातून उद्योगाला एका नविन उंचीवर नेऊन ठेवले. मुंबई मधील बोरविली व अन्य भागातील स्कॉय वॉक सह अनेक कामे त्यंानी केली. सैन्य दलातील बाधकाम क्षेत्रामधील अनेक नवीन इमारती उभारण्याचे काम त्यांनी उच्च दर्जा राखून यशस्वीरित्या पुर्ण करून विश्वास जिंकला. त्यामुळे त्याच्या यशाचा डंका सर्वत्र वाजत आहे. त्याच्या मुंबई येथील श्ेातात पालेभाज्या, नारळ, आंबे व चिंकुची झाडे व अन्य पिके घेतली जातात.

 
Top