लोहारा/प्रतिनिधी-
स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत नगरपंचायत लोहाराच्या वतीने स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी विद्याथ्र्यांची वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा नेताजी सुभाष चंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयात संपन्न झाली. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा  नगर पंचायत लोहारा व शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण प्राचार्या श्रीमती यु.व्ही.पाटील मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बी.एल. जाधव, डी. व्ही. धनवडे, प्रा.पी.जी.काळे,  प्रा.एस.डी. शिंदे, यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लोहारा नगरीच्या नगराध्यक्षा श्रीमती ज्योतीताई दीपक मुळे, उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, कार्यालयीन अधिक्षत जगदीश सोडगे, अदिंनी प्रयत्न केले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा.व्ही.एम. बुवा व डि.आर.जाधव यांनी काम केले.
विजयी छात्र
वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. प्रज्ञा सुरेश गोरे इ. 8 वी.( 2500 रू. व प्रमाणपत्र ), द्वितीय - जानकी बळीराम गोरे इ. 8 वी.( 1500 रू. व प्रमाणपत्र ), तृतीय -  स्नेहा संजय पाटील, इ. 12 विज्ञान, (100 रु. व प्रमाणपत्र ), निबंधस्पर्धेत प्रथम क्रमांक कु. स्वप्नाली गंगाराम भोंडवे इ. 11 वाणिज्य. (2500 रू. व प्रमाणपत्र), द्वितीय -  अमृता उमेश चव्हाण. इ. 11 वी वाणिज्य. (1500 रू. व प्रमाणपत्र), तृतीय - कु. अर्पिता अण्णासाहेब जावळे. इ. 11 वी  वाणिज्य (1000 रू. व प्रमाणपत्र ), यांनी विजय संपादन केले.
 
Top