
मुंडे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी
उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उत्तुंग व्यक्तिमत्वाचे मुंडे साहेब केवळ मराठवाडा आणि महाराष्ट्रचेच नव्हे तर ते सकल राष्ट्राचे नेते होते,असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी केले.
बेंबळी येथील प्रभाकर बोंदर विद्यालयात स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.तसेच यावेळी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात होते. ही स्पर्धा दोन गटामध्ये संपन्न झाली. प्रारंभी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.फुलारी मॅडम व विद्यालयाचे शिक्षकवृंद, बेंबळी येथील माजी सरपंच मोहन खापरे, माजी जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ सोनटक्के, नंदकुमार मानाळे, सलीम शेख, सचिन कोरे, अविनाश सोनटक्के, दिलीप सोनटक्के व इतर गावातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या आठवणी जागवुन कै. मुंडे यांना शब्दसमुनानी अभिवादन केले. यावेळी बोंदर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्कर बोंदर यांनी गोपीनाथराव मुंडे यांनी केलेल्या कार्याची माहिती सर्व विद्याथ्र्यांना देऊन अनमोल मार्गदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप केला.
वकृत्व स्पर्धेचे विजेते -
पहिली ते चौथी या पहिला गटातुन विद्यार्थी मुंगळे दिशा मनोज, मेंदर्गे श्रावणी राहुल, कुरेशी आलिजान गौस व पाचवी ते सातवी या दूसरा गटातुन विद्यार्थी मुंडे अनुष्का नारायण, तोरंबे प्राची शहाजी, पठाण आदिल नाशिरखान हे विजयी झाले. यावेळी सर्व विजयी व स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्याथ्र्यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.