उस्मानाबाद/प्रतिनिधी-
तुळजापूर तालुकाच नाही तर अवघ्या जिल्ह्याच्या विकासासाठी मी आणि माझा लोकमंगल परिवार अहोरात्र झटणार असल्याची ग्वाही भाजपाचे युवा नेते रोहन देशमुख यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिली. दरम्यान, त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्ह्यातील लोकमंगल समूह व त्यांच्या समर्थकांनी विविध कार्यक्रम उत्साहात पार पाडले.
रोहन देशमुख यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार व इतर घटकांतील नागरिकांच्या अडी-अडचणी सोडविण्याचा संकल्प सोडला आहे. जिल्ह्यातील नागरिकांना न्याय देण्यासाठी त्यांनी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संपर्क कार्यालये स्थापन केली आहेत. या कार्यालयाच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या अडी-अडचणी सोडविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असतो. या नेत्याचा दि. 12 डिसेंबर रोजी वाढदिवस असल्याने त्यांनी तर विविध संकल्प सोडलेच मात्र जिल्ह्यातील त्यांच्या समर्थकांनी विविध कार्यक्रम घेवून त्यांचा वाढदिवस साजरा केला. या दिवशी तुळजापूर येथील ग्रामीण रूग्णालयात रूग्णांना फळे वाटप करण्यात आली.
या कार्यक्रमास मकरंद लबडे, बाबा बेटकर, शिवाजी सरडे, बालाजी शिंदे, गजानन वडणे, नागेश चौगुले, अर्जुन कदम, विनोद देवकर, सुनिल साळुंके, रामकृष्ण तांबे आदींची उपस्थिती होती. तर काटगाव, तामलवाडी येथे वृक्षारोपन, शालेय विद्याथ्र्याना वह्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. उस्मानाबाद जिल्हा रूग्णालयात रूग्णांना फळे वाटताना तानाजी पाटील, भास्कर बोंदर, मोहन खापरे, प्रविण साळुंके, विनोद क्षीरसागर, विजय भूमकर, महेश पाटील, विक्की पडवळ, ज्ञानेश्वर मोहिते, महादेव साळुंके, भगीरथ तापडे, संतोष नाईक, ज्ञानेश्वर जमदाडे, मनोज शिंदे, काका माने, विनोद देवकर आदींची उपस्थिती होती.
 
Top