लोहारा/प्रतिनिधी
विद्याथ्र्यांमध्ये सुध्दा दर्जेदार गुणवत्ता व उच्चतम क्षमता आहे, असे प्रतिपादन जि.प.च्या उपाध्यक्षा तथा सभापती शिक्षण व आरोग्य सभापती अर्चना पाटील यांनी केले.
लोहारा गटशिक्षण कार्यालयाच्यावतीने तालुक्यातील तावशीगड येथील बालाजी विद्यालयात तालुकास्तरिय विज्ञान प्रदर्शन सोहळा घेण्यात आला. या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन अर्चना पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोहारा पं.स.च्या सभापती  अश्विनी पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्या शितलताई पाटील, लोहारा पं स.गटविकास अधिकारी अशोक काळे, लोहारा पं.स.उपसभापती  हेमलता रणखांब, शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ बलसुरचे उपाध्यक्ष गोविंदराव साळुंके, गटशिक्षणाधिकारी टी.एच.सय्यदा, पं.स.सदस्य वामन डावरे, ज्ञानेश्वर परसे, व्यंकट कोरे,  सुरेश पाटिल, बालाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.डी. कुलकर्णी, आदी उपस्थित होते.  प्रदर्शनात विद्याथ्र्यांनी धुम्रपाणाचे दुष्परिणाम, सौरऊर्जा, जलउर्जा, बायोगॅस, प्रदूषणमुक्त शहर व आपत्ती व्यवस्थापण, स्वच्छ हरित भारत, प्लास्टिक कचरा पुनर्वापर, अन्न व आरोग्य सुरक्षा आदी समाज उपायोगी विज्ञान प्रयोग सादर केले. या प्रदर्शनामध्ये जि.प. प्राथमिकचे 37, खाजगीचे 7 आणि माध्यमिक विभागातून 15 प्रयोग आणि शिक्षकांनी 6 शैक्षणिक साहित्य सादर केले होते. तसेच एकूण 965 विद्यार्थी सहभागी होते. परीक्षक म्हणून जवाहर विद्यालय अणदूरचे पी.ए.बिराजदार, ज्ञानप्रबोधिनी विद्यालय जकेकुरचे एस.एम. कांबळे, बालाघाट कनिष्ठ महाविद्यालय नळदुर्गचे एच.व्ही.पाटील यांनी काम पाहिले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी डी. एम.जंगम, एन.टी.आदटराव, भास्कर बेशकराव, आर.सी.मैदंर्गी, केंद्रप्रमुख एम.जी. वाघमोडे, आर.एस.चव्हाण, विषय साधन व्यक्ती ए.जी.लहाने, एस.बी.अवधुते, एस.एम.काळे, एस.एस.मुगळीकर, बालाजी  विद्यालय तावशीगडचे शिक्षक व कर्मचारी, अदिंनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.एम.जंगम यांनी केले तर आभार आर.एस. चव्हाण यांनी मानले. विज्ञान प्रदर्शनातील विविध प्रयोग पाहण्यासाठी तालुक्यातील अनेक शाळांमधून अंदाजे 1600 विध्यार्थी आणि परिसरातील विज्ञान विषयाचे प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top