कळंब/प्रतिनिधी-
कळंब तालुक्यातील गोविंदपूर येथे स्व. गोपीनाथ मुंडे  यांच्या जयंतीनिमित्त गोविंदपूर येथे रांगोळी स्पर्धा , भाषण स्पर्धा , रक्त दान शिबीर  तसेच शौलेय विद्यार्थाना साहित्य वाटप अशा विविध कर्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 40 जनांनी रक्तदान केले तसेच दि .12 रोजी गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला हार घालून श्रीफळ फोडून अभिवादन करण्यात आले. यावेळी युवा नेते वैभव मुंडे , महेश मुंडे दयानंद सोनवणे, संग्राम मुंडे , मोतिलाल मुंडे,प्रतिक मुंडे , बाळासाहेब मुंडे , गोटु मुंडे ,किशोर मुंडे, विश्वनाथ सोनवणे, परमेश्वर मुंडे, मेघराज मुंडे, दिलीप मिसाळ, नानासाहेब मुंडे, संदेश मुंडे , ऋषीकेश मुंडे, गणेश मुंडे, डिगांबर जाधवर, महेश पुरी, राजेश मुंडे  तसेच ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी बार्शी येथील भगवंत रक्त पेडीचे जनसंपर्क अधिकारी गणेश जगदाळे, सुहास धस, अमोल नवले, विजय तोडकरी , काजल दळवी, स्नेहल शिंदे यांनी काम पाहिले.

 
Top