उमरगा/प्रतिनिधी-
उमरगा चौरस्ता येथे जोगवा मागून पोट भरणा-या महिलेस कंटेनर ट्रकची धडक बसल्याने तिचा मृत्यू झाला ही घटना गुरुवारी दि. 12 रोजी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली.
या बाबतीत सविस्तर माहिती अशी की गुलबर्गा येथून चौरस्ता कडे येणा-या कंटेनर (क्रक्र जी.जे. 01 एच टी 7290) या ट्रक ने जोगवा मागून खाणा-या सुजिद्राबाईनागप्पा जिंगण  (वय 63 वर्षे रा. आळंद जिल्हा गुलबर्गा ) हिस जोराची धडक दिली. दरम्यान नरेंद्रचार्य महाराज संस्थान नांनीजच्या रुग्ण वाहिकेतु जखमी महिलेला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

 
Top