उस्मानाबाद/प्रतिनिधी-जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जिल्हा एचआयव्ही प्रतिबंध कार्यालय उस्मानाबाद व रामकृष्ण परमहंस महाविद्यालय उस्मानाबाद यांचे संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात आज 10 डिसेंबर रोजी विद्याथ्र्यांच्यात जाणीव जागृती व्हावी या उद्देशाने "जागतिक एचआयव्ही दिन पंधरवडा निमित्ताने एचआयव्ही विषयावर प्रबोधन व्हावे यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख होते. प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. बोधले आर.एच होते यावेळी त्यांचे एचआयव्ही व कायदे या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.यावेळी प्रा.डॉ.ए.बी.इंदलकर,प्रा.श्रीराम नागरगोजे,प्रा.माधव उगीले,प्रा.सौ.स्वाती बैनवाड,प्रा.मोहन राठोड, प्रा.राजा जगताप आदी उपस्थित होते. सदर या प्रबोधन कार्यक्रमात विद्याथ्र्यांच्यात एचआयव्ही विषयावर जाणीव जागृती करण्यात आली.सदर कार्यक्रमात जिल्हा एचआयव्ही प्रतिबंध नियंञण कार्यालयातील कर्मचारी यांनी विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक यांची एचआयव्ही व गुप्तरोग टेस्ट करण्यात आली ही टेस्ट मोफत करण्यात आली.152 जणांची टेस्ट करण्यात आली.
यावेळी श्री.महादेव शिनगारे (जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक), श्री.महादेव शितोळे (जिल्हा सहाय्यक मुल्यमापन व सनियंञण),श्री.समाधान नवले (समुपदेशक गुप्तरोग विभाग), श्री.संतोष कुंभार (समुपदेशक), श्री.सुधीर रोडगे(समुपदेशक), श्री.एन.आर.पाटील (प्रयोगशाळा तंञज्ञ), श्री.महादेव खुने (प्रयोगशाळा तंञज्ञ), श्री.धैर्यशील नारायणकर (समुपदेशक ए.आर.टी), श्री.अशोक मिरगणे (समुपदेशक ए.आर.टी), श्री.सुनिल निकम (डाटा मॅनेंजर ए.आर.टी) हे जिल्हा एचआयव्ही प्रतिबंध नियंञण जिल्हा शासकीय रूग्णालय उस्मानाबादचे कर्मचारी उपस्थित होते. सूञसंचालन प्रा.माधव उगीले यांनी केले.आभार प्रा.श्रीराम नागरगोजे यांनी मानले.