उस्मानाबाद/प्रतिनिधी-
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित स्थळाची आमदार तथा संमेलनाचे मार्गदर्शक समितीचे सदस्य कैलास पाटील यांनी मंगळवारी (दि.10) पाहणी केली. तसेच संमेलन संयोजन समितीमार्फत सुरू असलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेऊन विविध कार्यालय प्रमुखांना संमेलन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक ती कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
तसेच संमेलन संयोजन समितीमार्फत सुरू असलेल्या पूर्वतयारीचा त्यांनी आढावा घेतला. संमेलनाचे स्वागताध्यक्ष नीतीन तावडे यांनी संमेलनाच्या तयारीबाबत माहिती दिली. त्यावर आमदार पाटील यांनी संमेलन यशस्वीतेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी उपनगराध्यक्ष सुरज साळुंके, संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांच्यासह महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपालिका, पोलिस प्रशासन यासह विविध विभागाचे आधिकारी, साहित्य संमेलन संयोजन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top