वाशी/प्रतिनिधी-
 तालुक्यातील दसमेगाव येथे  सामुहिक श्रमदान मुहिम राबवून गाव स्वच्छ करण्यात आले. संपूर्ण गावातील गाजर गवत,  नाला सफाई , के साथ विविध स्थळावर ही सफाई मुहिम राबविण्यात आली.  ही स्वच्छता मुहिम  जन विकास संस्थेचे सचिव रामभाऊ लगाडे, अध्यक्ष सिमा बनसोडे यांच्या पुढाकारणातुन राबविण्यात आली.  या मुहिमेत  महिला बचत गट गावकरी यांनी  प्रतिसाद दिला. यावेळी उपसरपंच सामाधान उघडे , उत्रेश्वर मोरे , जाणीव संघटनेचे शेषेराव गाडे , किरण लगाडे , सत्यविजय लगाडे , अलका लगाडे, रेशम लगाडे, कविता लगाडे , सोमनाथ लगाडे, अनुराधा लगाडे ग्रा.प.सदस्य, रूपचंद खंडागळे, साहणुर पठाण , अविदा लगाडे व पन्नासहून अधिक महिला व पुरुष यांनी श्रमदानात सहभाग घेतला.
 
Top