उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 उस्मानाबाद येथील श्री नटराज डान्स अकॅडमीच्या संस्थापक व नृत्य कलावंत सौ. संगीता पाटील यांचा पुणे येथे मिसेस युनिव्हर्स पल्लवी कौशिक यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
 हा पुरस्कार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ऑडिटोरियम येरवडा पुणे येथे महाराष्ट्र राज्य डान्सर्स असोसिएशनतर्फे प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर सौ. पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 
Top