उस्मानाबाद/प्रतिनिधी-
महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना शाखा उस्मानाबाद यांच्या वतीने 3 डिंसेबर हा दिन दिव्यांग दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या गुणवंताना विविध पुरस्काराने २१ जणांचा सन्मान करण्यात आला.
विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणा-या दिव्यांगाचा सन्मान व्हावा यासाठी प्रति वर्षाला सर्वत्र दिव्यांग दिन साजरा करण्यात येतो. महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी जिल्हा शाखा उस्मानाबाद यांच्या वतीने उस्मानाबाद येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. उद्घाटन जिल्हा पोलीस अधिक्षक राजतिलक रोशन यांच्या हस्ते करण्यात आले . जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार होते . दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव शिंदे , महिला जिल्हाध्यक्षा ज्ञानेश्वरी शिंदे , वृंदा कुलकर्णी, जिल्हा नेते बाबूराव पवार, शिक्षणाधिकारी सविता भोसले , कोषाध्यक्ष महादेव विटकर, सचिव नागेश कदम यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती .
या वेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणा-याना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शशिकांत भातलवंडे, अल्लाऊद्दीन किनीवाले यांना दिव्यांग भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .अशोक आठवले, सादिक शेख याना दिव्यांग सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . पत्रकार मारूती कदम ,विस्तार अधिकारी शिवकुमार बिराजदार ,उपसंपादक विनोद बाकले , प्रदीप मदने ,याना दिव्यांग सन्मित्र पुरस्काराने गौरविण्यात आले. वंदना बिराजदार , शफी गवंडी , सद्रोद्दीन बेगडे , नितीन गवाड , जालिंदर आवटे , विशाल राजेश्वरकर , यशवंत मोहीते ,हणुमंत कोरे , संद्या लाटे दादासाहेब घोगरे , संजय पवार, यांचा दिव्यांग कर्मचारी रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला . दिपाली पाटील , स्मीता पाटोळे याना गीता बाबूराव पवार स्मृति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.गुणवंत पाल्याचाही गौरव करण्यात आला.प्रास्तावीक जिल्हाध्यक्ष महादेव शिंदे यानी केले .सुत्रसंचालन बी.एन. भंडारे यानी केले .आभार ज्ञानेश्वरी शिंदे यानी मानले . राज्य कार्यकारणीचे भारत देवगुडे , अरूण फावडे , अंजना पापडे , सुधिर काळे , यांची उपस्थिती होती व अनेक दिव्यांग कर्मचारी बांधव उपस्थित होते. तसेच संघटनेकडून कुष्ठधाम उस्मानाबाद येथे दिव्यांगदिनानिमित्त अन्नदान करण्यात आले.

 
Top