उस्मानाबाद/प्रतिनिधी-
वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे सख्ख्या भावाने भावाचा खून केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायधीश आर. व्ही. उत्पात यांनी यातील आरोपीस जन्मठेपेची शिक्षा व 5 हजार रुपये दंड ठोठावला आहे. ही घटना दि 9 एप्रिल 2017 रोजी घडली होती. यावर न्यायालयाने मंगळवारी दि. 3 डिसेंबर रोजी निकाल दिला.
याबाबत अधिक माहिती अशी की, वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील बप्पा छमा काळे याचा दारू पिऊन संपत्तीच्या कारणावरून चाकूने भोसकून भाऊ राजेंद्र छमा काळे याने खून केला होता. आरोपीच्या विरोधात गुन्हा घडल्याच्या दिवशीच कलम 302, 326, 504 भादंविसह 4/25 हत्यार अधिनियम 1959 प्रमाणे येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणी तपास अधिकारी एम. एच. जिरगे यांनी तपास करून आरोपीच्या विरोधात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाच्या वतीने एकूण 9 साक्षीदारांच्या साक्ष तपासण्यात आल्या. यात मृताची पत्नी व अज्ञान मुलगा यांची साक्ष या प्रकरणात महत्वाची ठरली आहे. तसेच परिस्थितीजन्य पुरावे, वैद्यकीय अहवाल, तपास अधिकाऱ्यांनी सादर केलेला पुरावा ग्राह्य धरून न्यायमूर्ती आर. व्ही. उत्पात यांनी आरोपीस जन्मठेपेची व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. यात आरोपी राजेंद्र उर्फ राजाभाऊ छमा काळे या आरोपीस खुनाच्या व मारहाणीचे कलम 302,326 या नुसार दोषी धरून ही शिक्षा सुनावण्यात आली. यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त शासकीय अभियोक्ता किरण कोळपे यांनी तर पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलिस फौजदार बाजीराव बळे यांनी काम पहिले.