२१ महिला संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढाला मोर्चा ; कठोर कारवाईची मांगणी 
उस्मानाबाद/प्रतिनिधी-
हैदराबाद येथे डॉक्टर महिलेवर अत्याचार, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुगाव  येथे 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार , तर उमरगा तालुक्यातील मुळज येथे मुलीला तिच्या घरा सहित पेटवून देण्याचा प्रयत्न झाला. महिलांवर होत असलेल्या अत्याचारांच्या घटनेच्या  निषेध करण्यासाठी व आरोपींना कठोर कारवाई करण्याच्या मांगणीसाठी गुरूवार ५ डिसेंबर रोजी  उस्मानाबाद येथे जवळपास 21  महिला संघटनांनी एकत्र येऊन महिला समन्वय समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम पासून निघालेल्या हा मोर्चा  डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा , छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी महिलांनी काळया साडया परिधान करून या घटनांचा निषेध  करत तीव्र संताप व्यक्त करणा-या घोषणा देत वातावरण दणाणून सोडले होते. हम भारत की नारी है  , फुल नही चिंगारी है, भारत माता की जय,  स्त्रियांचा सन्मान करा , आरोपींना कडक  शासन करा यासारख्या घोषणा दिल्या. यावेळी महिलांनी जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, अत्याचारित महिलांची प्रकरणे जलदगती न्यायालयात चालवून  आरोपींना कठोर शिक्षा द्यावी , समाजकंटकांचे वय हा मुद्दा लक्षात न घेता कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत,समाजात कायद्याचा  धाक निर्माण होण्यासाठी योग्य ती कायदेशीर पावले उचलण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या संघटनांनी घेतला भाग
राष्ट्रसेविका समिती, धारासूर मर्दिनी महिला फेडरेशन, जिजाऊ ब्रिगेड , जैन महिला मंडळ , शताक्षी महिला मंडळ , अखिल भारतीय विद्यार्थी परिषद , गुरुवार महिला मंडळ , भावसार महिला मंडळ , तेजस्विनी महिला मंडळ , उद्योगिनी महिला मंडळ , महिला विधिज्ञ मंडळ , अक्षरवेल महिला मंडळ , नवनिर्मिती महिला मंडळ , आनंदी ब्राह्मण महिला मंडळ , नारीशक्ती महिला मंडळ , व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय , सावित्रीबाई महिला मंडळ ,  प्रगती महिला मंडळ,रेणुका मंडळ,अष्टभूजा महिला मंडळ , व्यंकटेश महाजन कॉलेज, भारत संचार निगम लिमिटेड कर्मचारी  महिला मंडळ,संमती ग्रुप, भाजपा महिला आघाडी आदी महिलासंघटनांनी निषेध मोर्चा भाग घेतला.
 
Top