उस्मानाबाद/प्रतिनिधी-
शेतक-यांना नव्याने वीज जोडणी देण्याचे काम बंद झाले असून, केवळ सौरऊर्जा पंपच घेण्याचे अनिवार्य केल्याने शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. शिवाय ज्यांना नवीन जोडणी पाहिजे, त्यांनी स्वत: खर्च करून जोडणी घ्यावी लागणार असल्याने शेतक-यांच्या खिसा कापला जात असल्याची भावना शेतकरी वर्गात तयार झाली आहे.
जिल्हयात गेल्या तीन वर्षात दुष्काळ असल्याने अनेक शेतक-यांनी नवीन जोडणी घेण्यासाठी फिरकलेच नाहीत. दरम्यान, शासनाकडून मात्र नवीन वीज जोडणी देण्याची प्रक्रिया बंद केली आहे. यंदा जिल्हयात समाधानकारक पाऊस झाला आहे. दुष्काळानंतर अतिपावसाच्या संकटात सापडलेल्या शेतक-यांना रब्बी हंगामाने आधार मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. गेल्या तीन वर्षात अनेक शेतक-यांनी नव्याने विहिरी खोदल्या आहेत. तर काही शेतक-यांनी कूपनलिकांची खोदाई केली आहे. मात्र, पाण्याअभावी त्यांनी जोडणी घेतली नव्हती, असे शेतकरी आता नव्यसाने वीज जोडणी घेण्यासाठी महावितरण कंपनीच्या कार्यालयात जात आहेत. मात्र त्यांना नव्याने जोडणी बंद असलयाचे सांगितले जात आहे. ज्यांना नवीन जोडणी पाहिजे, त्यंानी थेट सौरपंप योजनेत सहभग घ्यावा, असे आवाहन केले जात आहे.
मात्र सौरपंप योजनेत सहभग घेतला तरी जोडणी केव्हा मिळेल, याची खात्री नाही. गेल्या दोन वर्षात अनेकांनी पैसे भरूनही त्यांना सौरपंप वीजजोडणी मिळालेली नाही.शिवाय त्यांना तात्काळ वीज जोडणी गरजेची आहे. त्यांनी खांबासह तारांचा खर्च स्वत: करण्याच्यासूचना शेतक-यांना केल्या जात आहेत. त्यामुळे वीज जोडणी स्वखर्चातूनच करण्याचे वीजकंपनीने ठरविल्याने शेतकरी वर्गाला आर्थिक हादरा बसला आहे.
 
Top