उस्मानाबाद/प्रतिनिधी-
स्पर्धेत केवळ जिंकण्यासाठी न खेळता आपली उत्कृष्ठ कामगिरी नोंदविण्यासाठी खेळल्यास यशस्वी होणारच, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले.
क्रक्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने भारत विद्यालय, उस्मानाबाद येथे दि.4 ते 07 डिसेंबर 2019 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय नेटबॉल स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, श्री. शिवछत्रपती पुरस्काराथी अंकुश पाटील, महाराष्ट्र राज्य नेटबॉल संघटनेचे सहसचिव श्री. श्याम देशमुख, जिल्हा नेटबॉल संघटनेचे अध्यक्ष कुलदीप खंडेरिया, जिल्हाक्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, सहायक जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक बनसोडे, तांत्रिक समितीचे सदस्य श्री.गणेश राऊत, श्री. संभाजी गायकवाड, श्रीमती वैशाली मेश्राम, तालुका क्रीडा अधिकारी सारिका काळे, क्रीडा अधिकारी कैलास लटके, नेटबॉल संघटनेचे सह सचिव श्री. महेश जाधव, राजेश बिलकले यांच्यासह कार्यालयातील सर्व कर्मचारी व आदी मान्यवर उपस्थित होते.
ही राज्यस्तरीय शालेय स्पर्धा महत्वाची आहे. या स्पर्धेमधून मध्यप्रदेश (इंदोर) येथे होणा-या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या संघाची निवड करण्यात येणार आहे,असे कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांनी सांगितले. या स्पर्धेमध्ये राज्यातील अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, लातूर, मुंबई, पुणे व कोल्हापूर अशा एकूण आठ विभागातून 192 खेळाडू, संघव्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी सहभागी झाले आहेत. क्रीडा अधिकारी कैलास लटके यांनी उपस्थितांचे आभार मानले तर परमेश्वर मोरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.