तुळजापूर/प्रतिनिधी-
 श्री तुळजाभवानी संस्थानच्या वतीने मिती मार्गशिष वध 30, गुरुवारी 26 रोजी सकाळी कंकणाकृती सुर्यग्रहण  असल्यामुळे  श्री तुळजाभवानी मातेच्या धार्मिक विधी वेळेत बदल करण्यात आला आहे. पहाटे 4.30 ते 5 निंबाळकर दरवाजा उघडणे , 5 ते 5.15 कालावधीत देवीचे चरणतिर्थ , सकाळी 7.40 ते  8.00 पुजेची घाट देणे,  पुजेस हाक मारणे, पुजारी देवीजवळ येणे निर्माल्य विसर्जन , सकाळी 8.4 ते10.55 या कालावधीत देवीजींना सोवळयात ठेवणे. 10.55 ते 1 यावेळेत पंचामृत शुध्द स्नान वस्ञोलंकार, आरती व धुपारती आदी धार्मिक विधी होणार असल्याची माहीती मंदीर समितीने दिली आह.े

 
Top