तुळजापूर/प्रतिनिधी-
 तालुक्यातील मंगरुळ येथील कंचेश्वर शुगर लिमिटेड या कारखान्याने उसाला प्रतिटन 2525 रुपये दर जाहीर केला असल्याचे माजी आमदार, शिवसेनेचे नेते,  कारखान्याचे मुख्य प्रवर्तक श्री. दिलीपराव माने यांनी दिली.
गळीत हंगाम 2019-20 मध्ये गाळपास येणा-या सभासद, बिगर सभासद व गेटकेन मधील उस उत्पादक शेतक-यांच्या उसाला 2525 हा दर देण्यात येणार आहे. कंचेश्वर शुगर कारखान्याने शेतक-यांच्या मागणीस्तव अल्पावधीत अनेक संकटांचा सामना करीत सिद्धनाथ पाठोपाठ कंचेश्वर नावाचा दुसरा कारखाना उभा केला. आतापर्यत कारखान्याने शेतक-यांच्या हिताचा निर्णय घेतला असून ही परंपरा अखंडीत ठेवत आहे. कारखान्याचा उस वजनकाटा तंतोतंत असल्यामुळे शेतक-यांनी विश्वासार्हता दाखवून आतापर्यंत कारखान्याकडे 40 हजार मेंट्रीक टन ऊस गाळपास पाठविला आहे. त्यामुळे ऊसतोडणी, वाहतूकदार तसेच ऊस उत्पादक शेतक-यांनी मंगरूळ येथील कंचेश्वर शुगर कारखान्याला जास्तीत जास्त ऊस गाळपास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहान श्री. माने यांनी केली आहे.

 
Top