उमरगा/प्रतिनिधी-
उमरगा तालुका महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची तालुका कार्यकारणी रविवारी जाहीर करण्यात आली.
संघाचे कार्याध्यक्ष इंद्रकुमार सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली  शासकीय विश्राम गृहात बैठक घेण्यात आली त्यात ही कार्यकरणी जाहीर करण्यात आली. यावेळी  जेष्ठ उपाध्यक्ष देविदास पावशेरे,  रघुवीर आरणे, महिला आघाडी प्रमुख पदी प्रेमकला व्हनंताळकर व महासचिव सुशीलकुमार चौगुले व वंदना गायकवाड यांची, उपसचिव  मोहन कांबळे, अनिल वाघमारे, कार्यालयीन सचिव पदी उस्मान मुजावर, संघटन सचिव चंद्रकांत कांबळे, प्रसिध्दी सचिव  जी. एल. कांबळे, खजिनदार विजयकुमार कांबळे, सहसचिव  गोपाळ गेडाम,डी आर काजळे, बालाजी खुडे,विलास अस्वले, टी पी पौळ, शेषेराव बोईनवाड, सल्लागार संघटक  एम .जी. गायकवाड, व्ही. जी.कांबळे, शेषेराव गायकवाड, राजेन्द्र सूर्यवंशी, सी ए काटे,  एकमताने निवड करण्यात आली. या वेळी तालुका अध्यक्ष राहुल कांबळे, मुख्यसचिव बालाजी गायकवाड आदींची उपस्थिती होती.
 महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ या संघटनेच्या वतीने राज्यातील एस सी.एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक समाजातील कर्मचारी यांच्या हिता साठी व त्यांच्या वर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून काम केले जाते संघटनेचे राज्यभर जाळे असून प्रत्येक कर्मचारी या संघटनेच्या बॅनर खाली येऊन समाजातील विविध समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत,असे मत तालुका अध्यक्ष राहुल कांबळे यांनी व्यक्त केले.
 बैठकीस उमरगा तालुक्यातील शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्था, आश्रम शाळा , जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य विभागातील कर्मचारी  मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राहूल कांबळे यांनी केले. आभार बालाजी गायकवाड यांनी मानले.
 
Top