लोहारा/प्रतिनिधी
भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर यांची महाराष्ट्र विधान परिषद कामकाज सल्लागार समितीच्या सदस्यपदी निवड झाल्यानंतर लोहारा तालुका भाजपाच्यावतीने यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीन काळे,  भाजपा जिल्हा सरचिटणीस संताजी चालुक्य, अँड.अनिल काळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अँड.नितीन भोसले, जि.प.चे अर्थ व बांधकाम सभापती अँड.अभय भैय्या चालुक्य, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा बँक उपाध्यक्ष कैलास शिंदे, भाजपा मिडिया जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे, भाजपा  तालुकाध्यक्ष माधव पवार (उमरगा), भाजपा तालुका उपाध्यक्ष तथा नोंदणी प्रमुख राजेंद्र पाटील (लोहारा), भाजपा मिडिया तालुकाध्यक्ष  इकबाल मुल्ला (लोहारा), पं.स.सदस्य वामन डावरे (अचलेर), पं.स.सदस्य ज्ञानेश्वर परसे (भातागळी), भाजपा तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे, हिराजी बुवा, अन्वर शहा  यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top