उस्मानाबाद/प्रतिनिधी-
पंतप्रधान किसान सन्मान योजनेची आढावा बैठक उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवार दि.७ डिसेंबर रोजी रात्री उशीरापर्यंत चालली. या बैठकीत खा.ओमराजे निंबाळकर, आ.कैलास पाटील यांनी ऑनलाईन माहिती अपलोड करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखण्याच्या सूचना सर्व तहसीलदारांना दिल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खंदारे यांची उपस्थिती होती.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे जिल्हयात एकुण २ लाख २८ हजार ४२८ लाथार्थी आहेत.त्यापैकी एक लाख ८५ हजार ४२८ शेतक-यांना योजनेची रक्कम प्राप्त झाली असल्याचे सांगण्यात आले. तर ४३ हजार लाभाथ्र्यांची माहिती ऑनलाईन प्रक्रियेत असल्याचे सांगण्यात आले. शेतक-यांना जितक्या लवकर लाभ देता येईल, तितक्या लवकर लाभ देण्यात यावा, अशी सूचना खा.ओमराजे यांनी दिली. सर्व तालुका प्रशासनाने अवकाळी पाऊसात झालेल्या नुकसानीचे आलेले अनुदान तत्काळ वितरीत करण्यात यावेत, असी सूचना ही यावेळी देण्यात आली.
 
Top