तुळजापूर /प्रतिनिधी
दशकातीलशेवटचेअसणारेकंकणाकृती सुर्यग्रहण' पार्श्वभूमीवर ' गुरुवार दि27रोजी श्री तुळजाभवानी मुळमुख्यमुर्ती ग्रहण काळात शुभ्र वस्ञात सोवळ्यात ठेवण्यात आली होती.सुर्यग्रहण काळात ढगाळ वातावरण असल्याने  नागरिकांनसह खगोल प्रेमींना सुर्यग्रहण पाहण्यापासुन वंचित राहावे लागले .आज पावसाचा सरीही  ग्रहण काळात पडल्या .सुर्यग्रहण काळात मंदीरात शुकशुकाट जाणवत होता माञ सुर्यग्रहण संपताच धार्मिक वृत्तीचा लोकांनी श्रीगोमुख श्रीकल्लोळ तिर्थकुंडात स्नान करुन ओल्याअंगाने देवीदर्शन करुन गोरगरीबांना दान केले.त्यानंतर स्थानिक मंडळीनी देवीस भाकरे पिठल्याचा नैवध दाखवून भोजन केले  सुर्यग्रहण पार्श्वभूमीवर पहाटे निंबाळकर दरवाजा उघडल्यानंतर 5.15 वा देवीचे चरणतिर्थ करण्यात आले.नंतर सकाळी८:०० वा अभिषेक पुजेची घाट करण्यात येवुन  पुजारी देवीआल्यानंतर  निर्माल्य विसर्जन ,करण्यात आले. नंतर सकाळी8.4ते10.55या कालावधीत देवीजींना  सोवळ्यात ठेवण्यात आले नंतर अकरा वाजता देवीजीस भाविकांचे दहीदुधपंचामृतअभिषेकपुजा करण्यात आल्यानंतर देवीस  शुध्द स्नान घालण्यात आल्यानंतर  वस्ञोलंकार घालण्यात येवुन  धुपारती करण्यात आली.
 
Top