विद्यार्थी व शेतक-यांना टोल माफी करण्याची मागणी 
उस्मानाबाद/प्रतिनिधी-
स्थानिक शेतकरी, वाहनधारकांना व विद्यार्थी वाहनधारकांना संपुर्ण टोल माफी करावी, फास्टटॅग प्रणाली ऐवजी रोख रक्कम घेऊन ये-जा करण्याची लाईनी वाढविण्यात याव्यात, जिल्हातंर्गत ९० रू.च्या ऐवजी प्रती वाहन ३० रू.टोल पुर्वप्रमाणे चालू ठेवावे आदी मागण्यासाठी शिवसेनेच्या वाहतूक सेनेच्या वतीने येडशी, तामलवाडी, पारगांव या टोलनाक्यावर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये खा.ओमराजे निंबाळकर व आ.कैलास पाटील यांनी सहभाग नोंदविला.
ज्या प्रमाणे पुणे, हडपसर या भागातील नागरिकांना ३० किलोमीटर आत टोल माफी आहे, त्याच पध्दतीने आयआरबीच्या टोल नाक्यावर जिल्हयातील वाहनधारकांना टोल माफी करावी,प्रत्येक टोल नाक्यावर प्रथम फास्टटॅग काढताना बाहीरील दलाली बंद करावी, टोल नाक्यावर आलेले वाहन ३ मिनिटाच्या आत पुढे सोडावे, वाहनास पुढे जाण्यास वेळ लागल्यास वाहन विनामुल्य सोडावे आदी विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. आंदोलनकत्र्यांच्या वतीने आयआरबीचे प्रकल्प संचालक सोलापूर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी पवार, उपजिल्हा प्रमुख जयराम चव्हाण, सुनील वाघ, रवि कोरे, विजय सस्ते, माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोडके, प्रदीप साळुंके, पप्पु मुंढे यांच्यासह मोठया संख्येने शिवसेनेक व लोक उपस्थित होते.
तुळजापूरात ही आंदोलन
तालुक्यात तामलवाडी येथे शिवसेनेच्या वतीने वाढीव टोल विरोधत टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, युवा सेना तालुकाप्रमुख ,प्रतिक रोचकरी, गणप्रमुख दत्तात्रय गवळी,कृष्णा घोटकर,नागेश घोटकर,विठ्ठल नेटके,अमोल घोटकर,दादा पाटील,तसेच तामलवाडीसह सुरतगाव,पिंपळा खुर्द,सांगवी,देवकुरूळी,पिंपळा बु येथील शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top