126 विद्याथ्र्यांनी केले रक्तदान ; नरेंद्र बोरगावकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन 
तुळजापूर/प्रतिनिधी-
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 126 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन बालाघाट शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव माजी आमदार नरेंद्र बोरगावकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोकुळराव शिंदे, प्राचार्य डॉ.  मोहन बाबरे , उपप्राचार्य नरसिंग जाधव, सिनेट सदस्य डॉ. गोविंद काळे, माजी नगराध्यक्ष मंजुषा मगर, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष किरण निंबाळकर, तालुका अध्यक्ष सौ. वर्षाराणी पवार, अश्विनी रुग्णालयाचे डॉ. रविराज काळे, डॉ. सुरेश थोरात, पीआरओ नागार्जुन जिंकले, कु. रुकय्या मुंडेवाडी, श्री विजय सरडे, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंखे, सिद्धार्थ बोरगावकर, आरिफ बागवान, सेवायोजना समन्वयक डॉ. एस. एस मोरे, डॉ. विनय चौधरी, डॉ. आशा बिडकर, डॉ. पी ई शिवशरण, डॉ. प्रवीण  भाले, डॉ. अशोक मर्डे, डॉ. बी एन वाघमारे, अधीक्षक धनंजय पाटील, प्रा रामलिंग थोरात, डॉ. सतीश महामुनीं, प्रा. एन. एस कदम, विजय बोधले यांची उपस्थिती होती.
 यावेळी 60 वेळा रक्तदान करणारे प्रा. राम थोरात यांचा माजी आमदार नरेंद्र बोरगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी याप्रसंगी  माजी आमदार नरेंद्र बोरगावकर, गोकुळ शिंदे , माजी नगराध्यक्ष सौ. मंजुषा मगर यांनी आपल्या भाषणातून शरद पवार यांना मनापासून शुभेच्छा दिल्या. कायक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रामलिंग थोरात आणि आभार एनएसएस प्रमुख डॉ. एस एस मोरे यांनी मानले. महाविद्यालय कर्मचारी जनार्दन सरडे व  सुरेश मुळे यांनी यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

 
Top