जळकोट/प्रतिनिधी-
 तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील झीरो लाईनमन म्हणून काम करत असलेल्या नंदकुमार दगडू गायकवाड (वय 37 वर्षे ) यांचा दि.14 डिसेंबर 2019 रोजी वीजेचा शॉक लागून मृत्यु झाला.          
याबाबत थोडक्यात असे की, सकाळी साडेनऊ वाजता जळकोट पासून पूर्वेकडे एक किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रक्रमांक 65 लगत असलेल्या सुनील शिवाप्पा छत्रे यांच्या शेतातील डीपीवर काम करत असताना 33 के.वी. उच्च दाबाच्या वाहिनीचा जोराचा धक्का लागून खांबारून खाली डोक्यावर आपटल्याने डोक्यास जबर मार लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सदर घटनेची माहिती नळदुर्ग पोलीस स्टेशनला कळविल्यानंतर बीट अंमलदार बांगर, पो. कॉ. कोळी यांनी घटनास्थळी पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र जळकोट येथे दाखल केले. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी सातपुते यांनी तपासणी करून पोलिसांकरवी प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले. सायंकाळी पाच वाजता भीम नगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, दोन मुले असा परिवार आहे.
 
Top