परंडा/ प्रतिनिधी-
परंडा तालूक्यात वाळू माफियांनी धुमाकूळ घातला असुन वाळू माफीयावर कारवाई करण्यासाठी पथकासह गेलेले परंड्याचे तहसिलदार यांच्या अंगावर वाळू ने भरलेला टॅक्टर घालून चिरडून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना दि.14 डीसेंबर रोजी सकाळी 5.30 ते 6 च्या सुमारास परंडा शहराजवळ असलेल्या भोत्रा रोडवरील आण्णा खडके यांच्या खडी मशीन येथे घडली. यामध्ये तहसिलदार अनिलकुमार हेळकर गंभीर जखमी झाले आहे.
घटना स्थळावरुन दोन टॅक्टर, एक टीप्पर जप्त करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच भुमचे उपविभागीय पोलिस आधिकारी विशाल खांबे ,उपविभागीय आधिकारी (महसुल ) श्रीमती मनिषा राशीनकर, पोलिस निरिक्षक इकबाल सय्यद यांनी सकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आता आरोपी विरूध्दात कोणती कारवाई होते याकडे संपूर्ण तालूक्याचे लक्ष लागले आहे .
या बाबत आधिक माहिती अशी की, परंडा तालुक्यातील सिनानदी भोत्रा परिसर तसेच देवगाव (खु) उल्का नदी तसेच तालुक्यातील विविध भागातील नदी पात्रातून मोठया प्रमाणात वाळूचे अवैध उत्खनन करुन चोरटी वाहतुक होत आहे. चोरलेली वाळू भोत्रा रोडवरील आण्णा खडके यांच्या खडी मशीनच्या खड्यावर विद्युत पंप बसवुन वाळू पाण्याने स्वच्छ करण्यात येत असल्याचे तहसिलदार अनिल कुमार हेळकर यांच्या पथकाला निर्दशनास आल्यानंतर पथकाने घटनास्थळी पोहचले. यावेळी वाळू चोर ट्रॅक्टर सह पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना तहसिलदार यांनी थांबविण्यास सांगितले असता ट्रॅक्टर चालकाने अंगावर टॅक्टर घातला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असुन त्यांना उपचारासाठी बार्शी येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.