
तालुक्यातील तुंगाव येथील अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या तीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवार दि 27 नोहेंबर रोजी संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शौचास गेले असता गावातील तिघांनी मिळून अतिप्रसंग केला. पीडित मुलीच्या फिर्यादी वरून तिघांच्या विरोधात मुरूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतीत सविस्तर वृत्त असे की, तुंगाव येथील पीडित मुलींची आई सायंकाळी पाणी भरण्यासाठी गेली होती त्या वेळी पीडित मुलगी मेंगशेट्टी यांच्या शेता जवळील हागणदारीत शौचास गेली असता रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास नवनाथ भांडारे हा येऊन पीडित मुलींचे तोड दाबून विहिरी जवळील मोकळ्या जागेत घेऊन गेला आणि आरडा केलीस तर तुझ्या आई वडिलांना खल्लास करतो अशी धमकी देऊन मला जमिनीवर आपटले व अतिप्रसंग केला.त्यानंतर तो शाळेच्या दिशेने निघून गेला त्या वेळी त्याचा मोबाईल तिथेच पडला होता त्यानंतर पीडित मुलगी घराकडे जात असताना गावातील अर्जुन साठे व मुस्तफा नाकेदार हे दोघे तेथे आले मुस्तफा यांनी नवनाथ याचा पडलेला मोबाईल उचलून घेतला व अर्जुन साठे यांनी पाठीमागून पीडित मुलींच्या छत्तीला दाबले त्यानंतर अर्जुन साठे व मुस्तफा या दोघांनी या घटनेबाबत कोणास कांही सांगितले तर विहिरीत टाकून खलास करतो अशी धमकी दिली त्यानंतर पीडित मुलीने रात्री घरी जाऊन आईस घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.मुरूम पोलिसात यांची फिर्याद मंगळवारी 3 डिसेंबर रोजी मंगळवारी दिल्या वरून आरोपीवर भादवी 354,376(3 ),506,34,अनुसूचित जाती जमाती अधिनियम नुसार कलम 3,(1 ) डब्ल्यु आय, 3 (1) बालकाच्या लैगिंक आपराधापासून सौरक्षण अधिनियम 2012 ,4,6,8,12 17 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले करीत आहेत.