उमरगा/प्रतिनिधी-
 तालुक्यातील मुळज येथील तरुणाने एका मुलींची छेड काढल्यामुळे त्याच्या विरोधात उमरगा पोलिसात बाल लैगिक अपराध संरक्षण अधिनियम 8,12,व अनुसूचित जाती जमाती अधिनियम कायद्याच्या आधारे सोमवारी दि 2 रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की पीडित मुलगी उमरगा येथे शिकण्यास येते दरम्यान मुळज येथील तरुण अजित लहू मुळजे हा पीडित मुलगी ही गावातून येताना व जाताना नेहमी छेड काढायचा गाडीचे हॉर्न वाजविणे हातावारे करणे,इशारा करणे माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणून पीडित मुलीला त्रास देत असे,कांही दिवसा पूर्वी एका मुलाजवळ पीडित मुलीला देण्यासाठी गिफ्ट पाठवून दिला तिने ते घेण्यास नकार दिला असता बस स्टँड वर येऊन तिच्या दंडाला धरून माझे गिफ्ट का घेतले नाहीस म्हणून तिची छेड काढला.व तिच्या दंडाला धरला तेंव्हा पीडित मुलीने मी आरडा ओरडा करेन आणि माझ्या घरी सांगेन म्हणताच कोणास सांगितले तर तुला ठार मारेन अशी धमकी दिली.मी घरी गेल्यावर आई व आजोबांना हे सांगितले त्यानंतर गावातील प्रतिष्ठित लोकांनी त्याची समज काढली त्यानंतरही त्याचे त्रास देने चालूच होते.रविवारी दि 1 रोजी रात्री नऊ वाजता आरोपी पीडित मुलींच्या घराकडे पाहून गाडीवर चकरा मारू लागला गाडीचे जोरजोरात हॉर्न वाजविणे चालू केले.पीडित मुलीचे सर्वजण घरी झोपले असता दाराला येऊन लाथा मारल्या व पीडित मुलीचे नाव घेऊन तू बाहेर ये असे म्हणू लागला.दरवाजा नाही उघडल्यास घराला जाळ लावून टाकीन अशी धमकी दिली त्यामुळे घाबरून घराच्या बाहेर कुणीही आले नाही तर रात्री घराच्या दाराला आग लावली त्यावेळी घरातील सर्वजण आरडाओरडा करीत बाहेर आले असता तो जीवे मारण्याची धमकी देत पळून गेला त्यामुळे पीडित मुलींच्या व तिच्या नातेवाईक यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
सोमवार दि.2 रोजी सकाळी पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिल्यानंतर उमरगा पोलिसांत कलम 354,ए.डी.506,436,बाल लैगिक अपराध संरक्षण अधिनियम 8,12, अनुसूचित जाती जमाती अधिनियम 3,1,डब्ल्यु, 3,2,व्ही,ए.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी अनुराधा उदमले या करीत आहेत.

 
Top