तुळजापूर/प्रतिनिपधी-
तालुक्यातील धनेगाव येथे श्री गुरूदेव दत्तात्रेय महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व गुरुचरिञ पारायण  सोहळयाचे आयोजन करण्यात आले आह़े.गुरुवार, दि़.5 ते 11 डिसेंबर या कालावधीत हा सप्ताह महोत्सव साजरा होणार आहे
धनेगाव  येथील धनाजी कुरुंद यांच्या शेतात श्रीदत्ताञय मुर्तीचे पुजन करुन  बुधवार, दि़ 5 डिसेंबर रोजी  सप्ताहास प्रारंभ होणार आहे. तसेच दैनंदिन काकड आरती गुरुचरिञ पारायण तुकाराम गाथा पारायण भजन, हरिपाठ, हरिकिर्तन,  हरिजागर अदि धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
   गुरुवार दि.5 रोजी हभप लक्षमण पांढरे महाराज  शुक्रवार दि.6 रोजी हभप काका सुतार महाराज, शनिवार, दि़ 7 रोजी हभप प्रभाकला दादा महाराज नाईकवाडी  रविवार, दि़ 8 रोजी हभप रघुनाथ तोंडे महराज  सोमवार, दि़ 9 रोजी हभप वसंत येलम महराज  मंगळवारी, दि़ 10 रोजी झी टाँकीज फेम हभप पांडुरंग रेड्डी महाराज तुळजापूर यांचे हरिकिर्तन होणार आहेत.  बुधवार, दि़ 11 रोजी पहाटे श्री दत्तगुरुंच्या मुर्तीला अभिषेक, सकाळी  गुरुचरित्र ग्रंथदिंडी, पालखी मिरवणूक, हभप भागवताचाय महादेव धनके शास्ञी महाराज यांचे कीर्तन होणार आह़े. नंतर महाप्रसादाचे वितरण करून सप्ताह सोहळ्याची सांगता होणार आह़े. या सप्ताह सोहळयाचा भाविकभक्तांनी लाभ घ्यावा असे धनेगाव ग्रामस्थांनी केले आहे.

 
Top