उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 जिल्हा परिषद शिक्षण विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले दिवंगत सचिन पडवळ यांचे अकाली निधन झाले. ते कंत्राटी असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना कोणतेही शासकीय लाभ वा मदत मिळाली नव्हती. त्यांची मुले लहान आहेत. त्यांच्या शिक्षणासाठी मदत व्हावी म्हणून कर्मचा-याकडून मदतीचे आवाहन करण्यात आले होते. तसे आवाहन बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री एम. ई. माने यांच्याकडून मंगरूळ बीट मधील सर्व सदस्यांना व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून करण्यात आले. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत अगदी दोनच दिवसात बीटमधील  शिक्षकांनी व परिवारातील सदस्यांनी रुपये एक लाख पंधरा हजाराची (115000/-) रक्कम तातडीने जमा करून दिवंगत सचिन पडवळ यांच्या कुटूंबास देण्यात आली.
मंगरूळ बिटने उपक्रमशील मंगरुळ बीट म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्याचबरोबर या परिवारातील प्रत्येक सदस्य आपली सामाजिक बांधिलकी जपत आलेला आहे.  जमा केली रक्कम  देणगीदारांच्या नावाच्या यादीसह   श्री रामलिंग काळे साहेब, अधिक्षक वर्ग-2 शिक्षण विभाग जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्याकडे रोख स्वरूपात सादर करण्यात आली. यावेळी मंगरूळ बीटचे शिक्षण विस्ताराधिकारी श्री एम. ई. माने, नांदूरी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री एस आर वाले, येवती केंद्राचे केंद्रप्रमुख  प्रतिनिधी श्री मिलिंद जानराव, मंगरुळ येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री नसीब शेख, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री उद्धव सांगळे, श्री सोमनाथ घोलप, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी श्री बशीर तांबोळी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मंगरूळ बीटच्या या सामाजिक बांधिलकी व दातृत्वाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
Top