उस्मानाबाद/प्रतिनिधी-
पानवाडी, म्होतरवाडी, जागजी (ता. उस्मानाबाद) या तीन गावचे पोलिस-पाटील सुभाष गणपतराव कदम-पाटील यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल जिला प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यासमोरील क्लबच्या मैदानावर मंगळवार दि.३ रोजी सायंकाळी लोकसभा व विधानसभा  सार्वत्रिक निवडणुकीत (२०१९) उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकारी, कर्मचा-यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पोलिस पाटील सुभाष कदम-पाटील यांचा जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे व पोलिस अधिक्षक राजतिलक रौशन यांच्या हस्ते सहकुटूंब सत्कार करण्यात आला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, अप्पर पोलिस अधिकारी श्री पालवे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, निवडणूक उपजिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, जि.प. अप्पर सीईओ अनुप शेंगुलवार आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने लोकसभा विधानसभा निवडणुकीत उत्कृष्ठ कार्य केलेल्या उपजिल्हाधिकारी पासून कोतवाल, पोलिस पाटील या पदापर्यंत सर्वांचा सन्मापत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 
Top