उस्मानाबाद/प्रतिनिधी-
तब्बल शतकाच्या प्रतीक्षेनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजनाचा बहुमान उस्मानाबाद जिल्ह्याला मिळाला आहे. हे यजमानपद उस्मानाबाद जिल्हावासीयांकरिता भूषणावह आहे. सर्वांच्या सहकार्यातून या संमेलनाचे रूपांतर नक्कीच लोकोत्सवात होईल असा विश्वास माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांनी व्यक्त केला.
मुरूम येथील श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना येथे साहित्य संमेलनाच्या प्रमुख मार्गदर्शक समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल श्री. पाटील यांचा संयोजन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी विठ्ठलसाई परिवाराच्या वतीने पाटील यांनी पाच लाख रुपयांचा धनादेश स्वागताध्यक्ष नीतीन तावडे, प्रमुख कार्यवाह रवींद्र केसकर यांच्याकडे सुपुर्द केला.
याप्रसंगी बोलताना श्री. पाटील म्हणाले, साहित्य आणि संस्कृती सामाजिक आरोग्य निकोप ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडतात. यातून समाजाला भरीव योगदान मिळत आले आहे. संयोजन समितीने संमेलनाचे यजमानपद उस्मानाबादकरांना मिळावे यासाठी घेतलेले कष्ट कौतुकास्पद आहे. अत्यंत सचोटीने हे संमेलन यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीतर्फे सुरू असलेल्या प्रयत्नात आपलेही सक्रिय योगदान निश्चितच राहील. तसेच साहित्य संमेलनाला व्यक्तीश: उपस्थित राहून विविध कार्यक्रमांचा आनंद घेणार आहोत. जिल्ह्यातील नागरिकांनीही संमेलनात सहभागी होऊन यथाशक्ती योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
याच कार्यक्रमात साहित्य संमेलन स्वागत मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यपदी निवडीचे पत्र आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप गरूड, प्रा. किरण सगर यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश आष्टे, माजी सदस्य दिलीप भालेराव, संमेलन समितीचे सहकार्यवाह प्रशांत पाटील, कार्यकरिणी सदस्य आशीष मोदणी, अग्निवेश शिंदे, युवराज नळे, दर्शन कोळगे, जयराज खोचरे आदी उपस्थित होते.