वाशी/प्रतिनिधी-
येथील क.मा.ज. महाविद्यालयातील वस्तीगृहात इयत्ता अकरावी मध्ये शिकणाऱ्या तरुणीने स्वत:ला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज (11 डिसेंबर) रोजी सकाळी सात वाजण्याच्या पूर्वीघडली.वस्तीगृहा मध्ये मुलीच्या पैशाची चोरी झाली होती. यामध्ये आपण चोरी केलेली नाही तरी आपले नाव येते की काय या भीतीने या तरुणीने (11 डिसेंबर) आपली जीवनयात्रा संपवली. महाविद्यालय व वस्तीगृह इतिहासातील पहिली अशी दुर्दैवी घटना आहे.
वाशी येथील क.मा.ज. महाविद्यालय हे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये नावाजलेल्या महाविद्यालय पैकी एक महाविद्यालय होय.या महाविद्यालयाने गेल्या काही वर्षापासून मुलींसाठी वस्तीगृहाची सोय केलेली आहे. सदर वसतिगृहासाठी प्राचार्या शारदा मोळवने यांनी बराच निधी खेचून आणत देखणं अस वसतिगृह उभ केलं आहे वस्तीगृहामुळे वाशी तालुक्यातील तसेच तालुक्यात बाहेरील मुलींच्या शिक्षणाची चांगली सोय झालेली आहे.याच वस्तीगृहामधे वाशी तालुक्यातील बावी येथील क्षितीजा शंकर शिंदे ही मुलगी राहत होती. या मुलीने या वर्षी अकरावी विज्ञान ला या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेला होता.
मागील दोन- तीन दिवसापूर्वी वस्तीगृहातील मुलींच्या काही रकमेची चोरी झाली होती, त्या पैशाचा शोधाशोध सुरू होता. या चोरीमध्ये आपण चोरी न करता आपले नाव येते की काय, आपले नाव कोणी घेते की काय, या विचाराने ती अस्वस्थ झालेली होती.आपलं जर या चोरी मध्ये नाव आले तर आपली बदनामी होईल, आपला अपमान होईल या भीतीने या मुलीने आज रोजी सकाळी सात वाजण्याच्या पूर्वी वस्तीगृहातील आपल्या राहत्या खोलीत गळफास घेऊन तीने आपले जीवन संपवल ही बातमी सर्वत्र पसरताच वाशी व परिसरातील सर्वांच्याच चर्चेचा विषय बनली. आत्महत्या केलेल्या तरुणी बद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती.
या घटनेची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रीतसर पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. वाशी पोलीस स्टेशन मध्ये या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर चोरगे हे करत आहेत.