उस्मानाबाद/प्रतिनिधी-
भारत पेट्रोलियम नियंत्रित व उस्मानाबाद पोलीस कल्याण विभाग संचलित आनंदनगर येथे नवीन पेट्रोल पंपाचे उद्घाटन आज जिल्हा पोलिस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या शुभहस्ते व मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार,उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे,जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, उपविभागीय पोलिस अधिकारी मोतीचंद राठोड, पोलीस निरीक्षक गजानन घाडगे,संजय बाबर, दत्तात्रय सुरवसे, राखीव पोलीस  निरीक्षक श्री.वाघमोडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.चव्हाण, श्री. शेख, पोलीस उपनिरीक्षक श्री. निंबाळकर, शांतता कमिटीचे सदस्य नगरसेवक खलिफा कुरेशी मसूद शेख, शमसुद्दीन मशायक, इम्तियाज बागवान,पोलीस अधीक्षक यांचे स्वीय सहाय्यक प्रल्हाद ऐनवाड, कार्यालय अधीक्षक श्री.शिंदे, प्रमुख लिपिक श्री.काळे, श्री.पवार यांच्या  प्रमुख उपस्थितीत  संपन्न झाला.
उस्मानाबाद पोलीस कल्याण विभाग यांच्याद्वारे या पेट्रोल पंपाचे संचालन केले जाणार असून या ठिकाणी चांगले काम केलेल्या पोलीस बॉइजना नोकरी देण्यात आली आहे. या पेट्रोल पंपावरील उत्पन्नाचा विनियोग पोलीस व पोलिस कुटुंबियांसाठी शिक्षण,आरोग्य आदी क्षेत्रातील कल्याणाकरिता केला जाणार आहे.
तरी उस्मानाबाद शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी उत्तम सेवा,उत्तम दर्जा असलेल्या या पेट्रोल पंपावरील सेवेचा लाभ घ्यावा आणि पोलिस विभागास सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस विभागातर्फे करण्यात आले आहे.

 
Top