उस्मानाबाद/प्रतिनिधी-
सीएए व एनआरसी कायद्याला विरोध करण्यासाठी आम्ही उस्मानाबाद या संघठनेच्यावतीने महामुक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला.
नागरी  संशोधन  कायदा (सीएए)व भविष्यात येणा-या राष्ट्रीय नागरीकत्व नोंदणी (एनआरसी) या विधेयकाचा निषेध करण्यासाठी उस्मानाबाद शहरात गुरूवार दि.२६ डिसेंबर रोजी दर्गा मैदान येथून भव्य मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा शहरातून विविध रस्त्याने जावून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चाच्या वतीने राष्ट्रपती यांना जिल्हाधिकारी यंाच्या मार्फत निवेदन पाठविण्यात आले. या मोर्चामध्ये मौ. जाफर, मौ. इम्रान यांनी देशात वादंग होऊ देणार नसून आम्ही संविधानाचे रक्षण करू, देशाची धर्मनिरपेक्षता टिकवून हिंदू-मुस्लिम एकजुटाने राहू त्यासाठी हा लढा उभारल्याचे सांगितले. तर राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगर व कॉंग्रेसचे विश्वास शिंदे यांनी अन्न, पाणी, निवारा याची सुविधा उपलब्ध करू न देता, परदेशी नागरिकांना सुविधा कुठून उपलब्ध करून देणार हे कायदे उत्तर पुर्व राज्यासाठी बनविले असताना देशात कशामुळे लागू करत आहेत. त्यामुळे त्याविरूध्द लढा देऊ, असे सांगितले. तर संजय दुधगावकर, महेंद्र धुरगुडे, प्रशांत पाटील यांनी संविधान कोणी ही बदलू शकत नाही, उगीच कोणाच्याही धार्मिक भावना भडकावू नका, असा इशारा दिला. यावेळी मराठा सेवा संघाचे नेताजी गोरे, भाजपाचे नाना घाडगे, माजी नगराध्यक्ष कॉंग्रेस मधुकर तावडे, अभय सांळुंके आदींची भाषणे झाले. शेवटी पंकज चव्हाण यांनी कन्हैय्यारकुमार यांचे गीत गाऊन समारोह केला. मोर्चा शांततेत पार पाडण्यासाठी ३०० स्वंयसेवकांनी परिश्रम घेतले.यावेळी पोलिस प्रशासनाच्या वतीने मोर्चाकरांचे अभिनंदन करून मोर्चा शांततेत पार पाडल्याबद्दल अनंद व्यक्त केला.
यावेळी जिल्हाधिका-यांना निवेदन देताना कॉंग्रेसच्या डा. स्मिता शहापूरक, समियोद्दीन मशायक, जगताप, सय्यद खलिल आदी दिसत आहेत.
 
Top