आमचे काम केले देवा, आता प्रसाद द्यावा या अभंगावर कीर्तन देत माकणी येथील श्री मारुती महाराज संस्थानचे पिठाधीश सुप्रसिध्द किर्तनकार हभप महेश महाराज माकणीकर यांनी परमार्थासह प्रसादाचे महत्व विषद केले.
शहरातील शांतीनिकेतन कॉलनी परिसरातील श्री दत्तगुरू नगरीमध्ये पिताश्री श्रीमंतराव रणदिवे प्रतिष्ठान‘या वतीने श्री गुरूदेव दत्तात्रेय महाराज यां‘या जन्मोत्सवानिमित्त आयोजित अखंड गुरूचरित्र पारायण, भजन, कीर्तन सप्ताह सोहळ्याची बुधवारी (दि़.11) काल्याचे कीर्तन व महाप्रसादा‘या कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली. यावेळी काल्या‘या किर्तनात ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना हभप महेश महाराज माकणीकर यांनी संत तुकाराम महाराजां‘या अभंगावर निरूपण करून परमार्थाचे महत्व विषद केल़े कोणत्या ना कोणत्या मार्गातून परमार्थ केल्यानंतर त्याचे फळ निश्चित मिळत़े परमार्थ करताना भंगवताशी जिव्हाळयाचे नाते जोडून करावा देवाने उपनिषद, शास्त्र, वेद, भगवत गिता‘या माध्यमातून जे सांगितले ते कराव़े परमार्थिक पथावर चालताना न भरकटता चालाव़े परमार्थाचे सोंग करू नय़े सत्कर्म, परमार्थाचे निश्चित फळ मिळत़े कोणत्याही कामाचे फळ मिळाल्याशिवाय ते पूर्णत्वास येत नाही़ आमचे काम केले देवा, आता प्रसाद द्यावा़़ असे सांगत त्यांनी प्रसादाचे महत्वही विषद केले. श्री दत्त जन्मोत्सवानिमित्त पहाटे श्री दत्तगुरूं‘या मूर्तीस महाअभिषेक करण्यात आला़ त्यानंतर सकाळी भव्य ग्रंथदिंडीसह पालखी मिरवणूक काढण्यात आली. मेडसिंगा येथील श्रीसमर्थ रावसाहेब बाबा पाटील वारकरी शिक्षण संस्थे‘या बालवारक-यांनीही या मिरवणुकीत सहभाग घेतला. अभंगासह टाळ -मृदंगा‘या तालावर ठेका धरून डोलणा-या बालवारक-यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. त्यानंतर काल्याने कीर्तन होऊन महाप्रसाद वाटपाने सप्ताह सोहळयाची सांगता करण्यात आली. सप्ताह सोहळयास प्रतिष्ठाणचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, संतोष बडवे, सह्याद्री फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. दिग्गज दापके -देशमुख, नंदकुमार गवारे, श्री़ मोदाणी, दत्ता लोकरे यां‘यासह भाविक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.