तुळजापूर/प्रतिनिधी-
तुळजाभवानी मंदिरात चोरी झाल्याची खोटी बातमी सोशल मीडियावर टाळल्याप्रकरणी मंदिर संस्थानने नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे मंदिर संस्थानची बदनामी झाली असून, भाविकांच्या भावना दुखावल्याचे मंदिर संस्थानने म्हटले आहे.
तुळजापूर तालुका पत्रकार संघाच्या व्हॉट्सअॅप गु्रपवर  तुळजाभवानी मंदिरातील जामदार खाण्यात दागिने चोरी झाल्याची घटना दिनांक 30 नोव्हेंबर रोजी घडली. सकाळी मंदिर उघडल्यानंतर ही गोष्ट निदर्शनास आली. त्यानंतर मंदिर संस्थानचे धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले यांनी घटनेचा पंचनामा केला. याप्रकरणी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा नोंद केला तसेच या प्रकरणाचा पुजारी मंडळाच्या वतीने निषेध करण्यात आला. या आशयाची पोस्ट लोखंडे नावाच्या एका व्यक्तीने टाकली. याप्रकरणी मंदिर संस्थानचे धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले यांनी लोखंडे यांना नोटीस बजवली.
 
Top