उस्मानाबाद /प्रतिनिधी -
रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने प्रधानमंत्री पीकविमा योजना चालू रब्बी हंगामात राबवण्यासाठी मान्यता दिली आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पीक विम्याचा हप्ता भरण्यासाठी 31 डिसेंबर 2019 ही अंतिम मुदत आहे.
या योजनेंतर्गत विमा हप्ता रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के व नगदी पिकासाठी 5 टक्के असा मर्यादीत ठेवण्यात आला आहे. शेतकऱ्यांना ज्या पिकाचा विमा उतरावयाचा आहे ते पीक शेतात पेरले असल्याचे स्वयंघोषणापत्र, सात-बारा उतारा, आधार कार्ड व बँक पास बुकच्या फोटोकॉपी प्रतींसह नजिकच्या बँकेत अथवा आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्ता भरून पीक संरक्षित करावे. तसेच पीक विमा योजनेत शेतक-यांनी सहभाग नोंदवावा. अधिक माहितीसाठी कृषी कार्यालयाशी व बँकेशी संपर्क साधावा असे आवाहन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केले आहे.