तुळजापूर/प्रतिनिधी-
भारतीय जनता पार्टीच्या वतीने तुळजापूर येथे शनिवार घेण्यात आलेल्या बैठकीत पक्षांतर्गत निवडणुक प्रक्रिया एका महिन्या पूर्ण करण्याबाबत चर्चा करण्यात आली.तुळजापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पार पडलेल्या या बैठकीला भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे, अॅड. अनिल काळे, अॅड. क्रांती थिटे, सत्यवान सुरवसे, प्राधिकरण सदस्य नागेश नाईक, विकास मलबा, प्रभाकर मुळे, विजय शिंगाडे, सुहास साळुंखे, साहेबराव घुगे, संतोष बोबडे, विक्रम देशमुख, अविनाश कोळी, नारायण नन्नवरे, सचिन पाटील, विशाल रोचकरी, शिवाजी बोधले, दिनेश बागल, बाळासाहेब शमराज, उमेश गवते, सुशांत भूमकर, सचिन घोडके, पद्माकर घोडके, आदेश कोळी, सचिन रसाळ आदींची उपस्थिती होती. यावेळी आ. राणाजगजितसिंह पाटील हे निवडूण आल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही घेण्यात आला. विकास मलबा यांनी आभार मानले.