उस्मानाबाद /प्रतिनिधी-
निवत्तीवेतनधारकांच्या निवृत्तीवेतनवाढीसाठी पेन्शनर्स राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने दिल्ली येथे नुकतेच आंदोलन केले होते. या आंदोलनात उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील 200 हून अधिक निवृत्त कर्मचा-यांनी सहभाग नोंदवला होता.
पेन्शनर्स राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक रावत यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथील रामलीला मैदानावर आंदोलन करण्यात आले होते. निवृत्त कर्मचा-यांना कोशियारी कमीटीने 2013 साली तत्कालीन सरकारला कर्मचा-यांना सेवानिवृत्त वेतनासंदर्भातील केलेल्या शिफारशी लागू कराव्या, सेवानिवृत्त कर्मचा-यांना मासिक पेन्शन 7 हजार 500 व महागाई भत्ता तसेच आरोग्य विषयक सवलती मिळाव्यात आदी मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते.
या आंदोलनात देशभरातील 27 राज्यातील सेवानिवृत्त कर्मचारी सहभागी झाले होते. यामध्ये, महाराष्ट्रातील निवृत्त कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थिती होते. तर उस्मानाबाद जिल्ह्यातून उस्मानाबाद जनता सहकारी बॅंकेचे सेवानिवृत्त कर्मचारी ज्योतीराम क्षिरसागर, लिंबराज डावकरे, प्रकाश शिंदे, परमेश्वर सुपेकर, रामचंद्र चौधरी, सुधाकर मोहिते, भास्कर साळुंके, दिलीप पवार, अरविंद पाटील, कमलाकर गरड आदी कर्मचारी सहभागी झाले होते.