लोहारा/प्रतिनिधी-
नेहरु युवा केंद्र उस्मानाबाद यांच्यावतीने लोहारा हायस्कुल शाळेच्या प्रांगणात तालुकास्तरीय खुल्या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन तहसीलदार विजय अवधाने यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन हायस्कुल शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर पांचाळ, जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, नेहरु युवा केंद्राचे तालुका समन्वयक किशोर होनाजे, क्रीडा शिक्षक गोपाळ सुतार, प्रा.राजपाल वाघमारे, मुकेश सोमवंशी, रोहन जगताप, गणेश साठे, वैजिनाथ पाटील, दयानंद पोतदार, विठ्ठल वचने पाटील, अदि उपस्थित होते. यावेळी कब्बडी, खो—खो, हॉलीबॉल, धावणे, रांगोळी स्पर्धा घेण्यात येत आहेत. यशस्वी संघाला नेहरु युवा केंद्र यांच्यावतीने प्रमाणपत्र व ट्राफीसह रोख रक्कम देण्यात येणार आहे. या यशस्वी संघासाठी रोख बक्षीस योगीराज सोळसे, नागेश पणुरे, अमोल बिराजदार यांच्यावतीने देण्यात येत आहे.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तालुका समन्वयक किशोर होनाजे, अजित गुरव, गुणवंत बिराजदार, अदिंनी परिश्रम घेतले.