उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्हा समाज सेवाभावी संघ यांच्या वतीने व उस्मानाबाद जिल्हा तेली समाज कळंब शाखेच्या वतीने शासकीय विश्रांमगृह येथे 10 वाजता बैठक संपन्न झाली.
 या बैठकीस जेष्ठ मार्गदर्शक कोंडाप्पा कोरे, जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,जिल्हापाध्यक्ष राजाभाऊ घोडके,यांनी जयंती साजरी करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले या बैठकीत सर्वानुमते शिवाजी चौक येथे जयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला.दि. 8 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10 वाजता संताजी जगनाडे, महारांजांच्या प्रतिमेचे पुजन खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आ.कैलास पाटील,नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे,माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे,मार्गदर्शक कोंडाप्पा कोरे,जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, प्रदिप मेटे, संजय मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थितीत पुजन करण्यात येणार आहे. तसेच शासकीय रुग्णालयात फळेवाटप,जनगाडे महारांचे चरीत्र वाचन असे विविध कार्यक्रमाचे दिवसभर आयोजन करण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह कळंब येथे बैठक घेऊन सदरील कार्यक्रमाची रूपरेषा या बैठकीत ठरवण्यात आली. या बैठकीस महादेव मेंगले, अर्जुन चिंचकर, सचिन देशमाने, अशोक चिंचकर, दत्ता शेवडे, बसवलिंग शेवते, गणेश शेवते, विजय देशमाने, नारायण क्षीरसागर, दादा चिंचकर,भागवत कीरवे, संदिप शेवते, अमोल गुरसाळे, यांच्यासह सर्व पदाधिकारी व समाज बांधव यांची उपस्थिती होती
 
Top