तुळजापूर/प्रतिनिधी-
पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडी करिता विशेष बैठक  दि.31 रोजी बोलविण्यात आल्याने पंचायत समितीच्या सभापती उपसभापती  काँग्रेस की,  भाजपाचा होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर तालुक्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळुन निघाले आहे.
तालुक्याचा राजकारणात वर्चस्व असण्यासाठी आमदारनंतर महत्वाची सत्ता पंचायत समितीवर असणे राजकिय दृष्ट्या महत्वाचे मानले जाते. सभापती म्हणजे मिनी आमदारच  संबोधला जातो. त्यामुळे पंचायत समितीवर सत्ता  मिळवण्यासाठी सर्वच पक्ष मोठे प्रयत्न करतात. या पाश्र्वभूमीवर आमदार पद भाजपाकडे गेल्याने कांँग्रेस  पंचायत समितीवर सत्ता कायम ठेवण्यासाठी जीवाचे रान करणार यात शंक नसल्यानेच ही निवडणुक काँग्रेससाठी अस्तित्वाची ठरणारी आहे. त्यामुळे पंचायत समितीवर सत्ता कुणाची येणार या बाबतीत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
तुळजापूर पंचायत समितीमधील काँग्रेस चे दोन सदस्य अपाञ ठरल्याने या निवडणुकीत बदलत्या राजकिय परिस्थितीत प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. या दोन सदस्यांनी हायकोर्टात धाव घेतली असुन यावर शुक्रवार निकाल अपेक्षित आहे .या दोन सदस्यांचा अपाञतेला निश्चितपणे स्थिगीत मिळेल , असे काँग्रेसकडून  आत्मविश्वास पुर्वक सांगितले जात आहे. सध्या तुळजापूर पंचायत समिती मध्ये एकुण अठरा सदस्य आहेत. त्यात काँग्रेसचे १० होते. त्यातील दोन सदस्य  अपाञ ठरले असुन त्यांच्याकडे ८ सदस्यांचे संख्या बळ आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ८ सदस्य आहेत. पण ते भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे त्यांचा ओढा अधिक आहे. त्यांनी या निवडणूकिचे नेतृत्व  आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या वर सोपवला आहे. सध्या काँग्रेसकडून सभापती पदासाठी विद्यमान उपसभापती सुनिता अशोक पाटील (जलकोट ), वैशाली धनराज मुले (अणदूर), अनिता ज्ञानेश्वर तोडकरी (सावरगाव ) यांचे नावे चर्चत असुन उपसभपती पदासाठी शिवाजी साठे यांचे नाव चर्चत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस कडून रेणुका भिवा इंगोले (खुदावाडी) याचे नाव सभापती पदासाठी चर्चेत असुन उपसभापती पदासाठी येथे इछुकांची संख्या मोठी आहे
  पीठासन अधिकारी तहसिलदार तांदळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार बैठक
मंगळवार दि.31 डिसेंबर 2019 सकाळी 10.00 ते 12.00 पर्यंत सभापती व उपसभापती पदासाठी नामनिर्देशनपत्र स्वीकारणे. दुपारी 2.00सभेस सुरुवात करणे, दुपारी 2.00 ते 2.15 सभापती व उपसभापती पदासाठी प्राप्त नामनिर्देशन पत्राची तपासणी. नामनिर्देशन पत्राची छाननी. दुपारी 2.15 वाजता वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवाराची नावे वाचून दाखवणे. दुपारी 2.15 ते 2.30 वाजता उमेदवारी परत घेणे. दुपारी 2.35 वाजता उमेदवारी परत घेतलेल्या उमेदवाराची नावे वाचून दाखवणे. दुपारी 2.40 निवडणूक लढविणा-या उमेदवारीची नावे वाचून दाखवणे. दुपारी 2.40 ते 3.45 वाजता आवश्यक असल्यास मतदान प्रथम सभापती पदासाठी व नंतर उपसभापती पदासाठी.दुपारी 3.45 ते 4.30 मतमोजणी, निवडणूकीचा निकाल जाहीर करणे या प्रमाणे निवडण्ूाक कार्यक्रम असणार आहे.
 
Top