उस्मानाबाद /प्रतिनिधी- पांचाळ सोनार समाज सेवा संस्था उस्मानाबादच्या वतीने रविवार (दि.15 डिसेंबर) रोजी येथील पुष्पक मंगल कार्यालयात राज्यस्तरीय वधु - वर परिचय मेळावा होत असून सध्या या मेळाव्याची जय्यत तयारी सुरु आहे.
या मेळावा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय पंडीत (न्यु राज ज्वेलर्स उस्मानाबाद) यांची उपस्थिती असुन मेळाव्याचे उद्घाटक म्हणून सुभाष वेदपाठक (मोडनिंब), प्रमोद वेदपाठक (माढा) यांची उपस्थिती असणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.संतोष पोद्दार यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.
तसेच या मेळाव्यात समाजातील मान्यवर व्यक्तींचा कृतज्ञता व गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला असून या सोहळयात सुभाष दिक्षीत (समाजसेवक धायरी), अरुण पंडीत (समाजसेवक विजयपूर), डॉ.सौ.मंगलताई महामुनी एमबीबीएस आरोग्य सेविका (माळसिरस), सौ.रंजनाताई धर्माधिकारी (प्रथम महिला सरपंच डोंगरगाव ता. हवेली), भारत खोगरे (उद्योगरत्न औरंगाबाद), संजय आष्टीकर (समाजरत्न आष्टी), एन.आर.सोनार सर (शिक्षणमहर्षि उस्मानाबाद), डॉ.मधुकर वेदपाठक (एम.ए.एम. फील,पी.एच.डी मुरुड जंजीरा शिक्षण तज्ञ), राजेंद्र पोद्दार (कृषीरत्न ऐनापूर), अशोक पंडीत (यशस्वी उद्योजक गेवराई), लक्ष्मणराव धर्माधिकारी (समाजप्रबोधनकार सासवड), डॉ.सतिश महामुनी(पत्रकारिता तुळजापूर), मिलींद महामुनी (वधुवर सुचक उंब्रज), सुनील महामुनी (समाजसेवक पाटोदा) यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात येणार आहे. या मेळाव्याला राज्यभरातून समाजबांधव येणार असून संस्थेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत आहे. तरी या मेळाव्यासाठी मोठया संख्येने वधुवर, पालक, समाजबांधव यांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अशोक दिक्षीत, अशोक काटकर, मनोज पंडीत, प्रशांत वैरागकर, संतोष पंडीत, महेश म्हेत्रे, तानाजी वेदपाठक, संजीव पोद्दार, सौ.लताताई दिक्षीत, सौ.सायली वेदपाठक, सौ.सविता मनोज पंडीत आदींनी केले आहे.