लोहारा/प्रतिनिधी
 छत्रपती कामगार संघटना व हिंद लँब यांच्यावतीने उमरगा व लोहारा तालुक्यात नोंदणीकृत बांधकाम कामगारासाठी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आला आहे. सदरील शिबीरामध्ये बांधकाम कामगार व बांधकामशी निगडीत असलेले असंघटीत कामगार ज्यांची नोंदणी सरकारी कामगार अधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे झालेली आहे. अशा कामगारासाठी शासनाच्यावतीने विविध प्रकारच्या 15 तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत.
नोंदणीकृत बांधकाम कामगार व इतर असंघटीत कामगार यांनी आपले मंडळाचे ओळखपत्र दाखवुन शरीराची तपासणी करुन घ्यावे, असे अवाहान हिंद लँब व छत्रपती कामगार संघटनेचे अध्यक्ष तानाजी गायकवाड यांनी केले आहे. उमरगा पं.स.सभागृहात दि.22 डिसेंबर 2019 रोजी, माडज ग्रा.पं.ता.उमरगा येथे दि.24 डिसेंबर 2019 रोजी, दाळींब ग्रा.पं. ता.उमरगा येथे दि.27 डिसेंबर 2019 रोजी,  ज्ञानेश्वर विद्यालय तुरोरी ता.उमरगा येथे दि.20 डिसेंबर 2019 रोजी, महिला केंद्र कलदेव लिंबाळा ता.उमरगा येथे दि.30 डिसेंबर 2019 रोजी, महिला सभागृह जेवळी ता.लोहारा येथे दि.31 डिसेंबर 2019 रोजी, महिला केंद्र नारंगवाडी ता.उमरगा येथे दि.2जानेवारी 2020 रोजी, बौध्द समाज मंदिर उमरगा शहरात दि.4 जानेवारी 2020 रोजी, समाज मंदिर सास्तुर ता.लोहारा येथे 8 जानेवारी 2020 रोजी, आण्णाभाऊ साठे सभागृह मुरुम ता.उमरगा येथे दि.12 जानेवारी 2020 रोजी, अंबाबाई मंदिर सभागृह तहसील रोड लोहारा येथे दि.10 जानेवारी 2020 रोजी, विठ्ठल मंदिर शिवाजी चौक माकणी ता.लोहारा येथे दि.14 जानेवारी 2020 रोजी आरोग्य मोफत तपासणी शिबीर घेण्यात येणार आहे. या आरोग्य शिबीरात   किडणी तपासणी, लिव्हर तपासणी, चरबी   तपासणी, मलेरिया तपासणी, लघवी तपासणी, थायरॉईड तपासणी, रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणी, रक्ताचे प्रमाण व पेशी तपासणी, छातीची तपासणी, कानाची तपासणी, डॉक्टर फीजीकल तपासणी, जुने आजार तपासणी, मग्नशियम तपासणी, आयरण तपासणी या शिबीराच्या माध्यमातुन करण्यात येणार आहे.

 
Top